काही वेळेपूर्वी मेसेंजरमधील त्या व्यक्तीशी झालेल्या गप्पांचा प्रभाव होता की माझ्या सौंदर्याचा प्रभाव होता पण माझ्यातील स्त्रीत्वाने माझ्या पुरूषत्वावर आता मात केली होती. पण आता ते काहीही असले तरी ही अनुभूती खूप छान होती.
“इश्श्य! पुरूष म्हणून जीवन जगणं, हे काही जगणं आहे? खरी मजा तर स्त्री होण्यात आहे!” मी स्वतःशीच पुटपुटलो.
मग मी माझ्या डाव्या खांद्यावर साडीचा पदर ठेवला आणि त्याची लांबी निश्चित केली. मग उरलेल्या साडीच्या निऱ्या बनवून मी परकरमध्ये खोचल्या आणि पदर सारका करून पुन्हा खांद्यावर ठेवला.
मी साडी नीट नेसल्याचे समाधान झाल्यावर मी आरशासमोर गेलो आणि आरशात पाहत उजवीकडून डावीकडे वळून स्वतःची खात्री करून घेतली. साडीचे सूत अतिशय पातळ आणि मऊ असल्याने पदर माझ्या खांद्यावरून वारंवार सरकत होता आणि मी तो सावरत होतो.
साडी नेसल्याबरोबर माझा उरला सुरला पुरुषार्थही दूर निघून गेला होता. मी एका हाताने माझा पदर तर दुसऱ्या हाताने माझे लांब केस सावरत होतो. जेव्हा पदर खांद्यावरून खाली सरकायचा, तेव्हा दुसऱ्या हातातील केस सोडून मी माझा पदर सावरायचो.
खांद्यावरून पदर सरकणे, हे माझ्यासाठी नवीन नव्हते. पण मी या आधी कधीही स्लीव्हलेस ब्लाउज घातला नव्हता. माझ्या पूर्ण मोकळ्या गुळगुळीत हाताला साडीचा तो मऊ स्पर्श एक सुंदर अनुभूती देत होता. त्या मऊ स्पर्शाने माझ्या अंगावर शहारा आला आणि माझे हात पूर्वीपेक्षा अधिक नाजूक वाटू लागले.
“बाई ग! आता एवढे कठीण जात तर बांगड्या घातल्यावर काय होईल? ही साडी विनाकारणच नेसली. स्तनही किती बाहेर आलेले दिसत आहेत. इश्श्य!” पदर हाताळताना मी स्वतःशीच पुटपुटलो.
आता मी शरीरानेच नाही तर मनानेही स्त्री झालो होतो. स्वतःला या पेहरावात पाहून माझे मन प्रसन्न झाले होते. माझे चालणे, वागणे, हावभाव आणि मादकता या गोष्टीचे साक्षीदार होते की, मी माझे पुरूषत्व गमावले आहे.
पण सत्य हेच होते की, साडीत मादक दिसणार्या या आकर्षक शरीराचा मालक एक पुरुष होता. माझ्यातील स्त्री फक्त एक भाडेकरू होती, जिने साडी नेसून काही वेळेपुरता माझ्या नरदेहावर पूर्ण ताबा मिळवला होता.
जेव्हा माझ्या लक्षात आले की माझे स्तन बाहेर आलेले दिसत आहेत, तेव्हा मी आपल्या उघड्या स्तनांना पाहून लाजलो! माझ्या मनात आले की, जर काही वर्षांपूर्वीचे माझे पुरुष रूप आता माझ्या समोर उभे असते आणि त्याने मला असे साडीत पाहिले असते तर त्याने माझ्याबद्दल काय विचार केला असता?
हो, ती साडी माझे स्तन पूर्णपणे लपवू शकत नव्हती. समोरून ब्लाउज आधीच खोल गळ्याचा होता आणि साडीही अर्धपारदर्शक होती. त्यामुळे मी माझ्या पदराने माझे स्तन झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होतो.
खांद्यावरील पदर हाताळत मी आरशाच्या डाव्या बाजूला असलेल्या ड्रॉवरकडे गेलो. साडी नेसल्यानंतर माझी चाल पूर्णपणे बदलली होती. आता मला सरळ माझ्या नाकाच्या रेषेत छोटी छोटी पावले टाकत पुढे चालावे लागत होते, त्यामुळे मी माझे नितंब मटकावत चालत आहे, असे वाटत होते.
प्रत्येक पावलावर माझ्या गुळगुळीत मांड्या एकमेकांवर घासत होत्या. हा अनुभव आता माझ्यासाठी नवीन नव्हता. त्यामुळे चालताना मला अडचण येत नव्हती. खरं तर ही एक सुंदर अनुभूती होती, जी फक्त स्त्रियांना मिळते, पुरुषांना नाही. मी पुरूष असूनही ही भावना अनुभवत होतो.
पुरूष किती दुर्दैवी असतात की, चालताना त्यांच्याकडे कोणी पाहतही नाही. माझ्याबाबतीतही असेच होते. पण जेव्हा मी साडी नेसून स्त्री बनतो, तेव्हा माझी चाल पाहून कित्येक पुरूषांचे लिंग अनियंत्रित होत असेल, असा आत्मविश्वास मला कायम होता.
तसे साडी नेसून आरामात चालण्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. मुलींनाही साडी नेसून चालणे गैरसोयीचे वाटते. दुसरीकडे, साडी नेसणे हे प्रत्येक क्रॉस ड्रेसरचे स्वप्न असते. परंतु जेव्हा तो स्वतः साडी नेसतो, तेव्हा तेच सुंदर स्वप्न त्याला किती कठीण वाटते.
मी एक पुरूष असूनही साडी नेसून, माझ्या लाडक्या रुपाली वहिनीसारखा सहजतेने आणि आरामात चालतो. याच्यावर आता मला अभिमान वाटत होता.
आता मी उभा राहून मी थोडा पुढे वाकलो आणि ड्रेसिंग टेबलच्या डावीकडील भिंतीवरच्या वॉर्डरोबच्या उघड्या ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधू लागलो. पण साडी नेसल्यानंतर खाली वाकून हाताने काहीतरी शोधणे हे ब्रा पॅन्टीमध्ये खाली वाकण्यापेक्षा जास्त कठीण होते.
मी एका हाताने माझा खांद्यावरून खाली सरकणारा पदर सांभाळत होतो. तर दुसर्या हाताने, मी वाकून उभा असल्याने माझे मोकळे केस पुन्हा पुन्हा माझ्या चेहऱ्यावर येत होते, ते कानाच्या मागे करत होतो. त्यामुळे स्वतःला सांभाळू की ड्रॉवरमध्ये शोधू, अशी माझी अवस्था झाली होती!
तेवढ्यात मी शोधत असलेली ती गोष्ट मला पटकन सापडली! एका कापडी पिशवीत मी अनेक रंगीबेरंगी डिझायनर पिना ठेवल्या होत्या. त्यांपैकी माझ्या साडीला जुळणाऱ्या दोन पिना काढल्या आणि उरलेल्या पिना परत त्या पिशवीत टाकल्या आणि पुन्हा आरशासमोर पोहोचलो.
सगळ्यात आधी मी माझा पदर एका पिनने ब्लाउजमध्ये अडकवला आणि दुसरी पिन साडीच्या निऱ्यांमध्ये घातली. पूर्वी मी खूप पिना लावायचो पण आता मला साडीत एवढा सराव झाला आहे की फक्त दोन पिना लागतात.
आता मी स्वतःला आरशासमोर पाहिले. स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये माझे बारीक हात आकर्षक दिसत होते. वॅक्स आणि बॉडी लोशनमुळे ते नितळ चमकत होते. डावा हात तर पूर्णपणे पदराने झाकलेला होता.
त्या अर्धपारदर्शक हिरव्या नेटच्या साडीत माझ्या लाल ब्लाउजचा संपूर्ण आकार आणि डिझाइन स्पष्ट दिसत होते. तो मोठा गळ्याचा ब्लाउज आणि ती अर्धपारदर्शक साडी, माझ्या गोऱ्या गुळगुळीत स्तनांची खोली आणि उभार उघडपणे दाखवत होते.
साडी पातळ असल्याने माझ्या अंगाला चिकटली होती. त्यामुळे माझी २७ची नाजूक कंबर आणि नाभी स्पष्ट दिसत होती. माझ्या गोर्या अंगावर एक कणभरही चरबी वाटती नव्हती, म्हणूनच ती साडी माझ्यावर इतकी खुलली होती.
माझे बारीक, गुळगुळीत आणि नाजूक हात पाहून, कधी काळी हा १५ इंच बायसेप्स असलेल्या पुरुषाचा मजबूत हात असायचा, हे कुणाला स्वप्नातही वाटणार नाही. ब्लाउजमधून बाहेर डोकावणारे माझे स्तन साडीच्या पदराखाली स्वतःला लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना पाहून, कधी काळी ती पुरुषाची रुंद छाती असायची, असे कुणाला स्वप्नातही वाटणार नाही.
काळे डोळे, गडद लाल ओठ, लाल रंगाची नखे, मोठे स्तन, साडीने वेढलेले शरीर आणि डाव्या खांद्यापासून कंबरेपर्यंत रूळणारे काळे लांबसडक केस माझ्या नरदेहाला स्त्री रूप देण्यास पुरेसे होते.
पण मी अनेकदा माझ्या वहिनीच्या तोंडून असे ऐकले होते की, ‘जेव्हा एखादी स्त्री आपल्या प्रियकरासाठी नटते तेव्हा ती सर्वात सुंदर दिसते आणि एकदा ती नटायला लागली की, कोणीही तिला थांबवू शकत नाही.’
माझ्या फ्लॅटमध्ये मी एकटाच होतो. इथे मला थांबवायला कोणी नव्हते, माझ्यातील पुरुष सुद्धा कधीच मला सोडून दूर निघून गेला होता. आता मी फक्त स्त्री होतो, जी आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी नटत होती. तेव्हा मी तरी कसा थांबणार होतो? मी माझे नटणे पुढे सुरू ठेवले.
(क्रमशः)