आता मला खरंच जीव द्यावासा वाटला. मी ज्यांच्यावर निस्वार्थ प्रेम केले त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळवली नव्हती.
एकीकडे श्रेया होती, जिला मी दोन वर्षांपासून ओळखत होतो. तिला मी कित्येक वेळा तिच्या घराजवळ सोडले आहे. पण कधीच तिच्या घरात गेलो नाही किंवा तिच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली नाही.
आतापर्यंत तिने मला तिचे कित्येक फोटो आणि न्यूड्स सुद्धा पाठवले होते. पण मी कधीही तिचे फॅमिली फोटो पाहिले नव्हते. तिने जेव्हा मला सांगितले की, तिचा भाऊ दिल्लीला असतो. तेव्हाही तिने मला त्याच्यासोबत काढलेला एखादा फोटो दाखवला नाही.
दुसरीकडे, कार्तिक श्रेयाचा मोठा भाऊ होता. पण गेल्या वर्षभरापासून मी त्याला त्याच्या फेसबुकवरील नावाने फक्त ‘जय’ म्हणून ओळखत होतो. मीही त्याला कधी त्याचे खरे नाव विचारले नाही किंवा त्याला माझे खरे नाव सांगितले.
ज्याप्रमाणे मी त्याला ‘जय’ म्हणून ओळखतो त्याप्रमाणे तोसुद्धा मला फक्त ‘शिखा’ नावाने ओळखत होता. काही वेळेपूर्वी कॉलनीच्या गेटवरील वॉचमन त्याला कोणाला भेटायचे म्हणून विचारत होता तेव्हाही तो चाचरत होता आणि त्याचमुळे तो त्याला आत येऊ देत नव्हता.
आता श्रेया आत आली आणि मी भीतीने उठून उभा राहिलो. जर तिने मला फक्त साडी नेसलेल्या अवस्थेत पाहिले असते तर कदाचित तिने मला समजून घेतले असते.
पण तिने मला अशा अवस्थेत पाहिले, ज्या अवस्थेत एक प्रियसी आपल्या प्रियकरासोबत रत होत आहे. आपल्या भावाला आणि प्रियकराला रत होताना पाहून तिचा राग अनावर झाला होता.
ती रागारागात माझ्या जवळ आली आणि खाडडऽऽऽ!!
क्षणभर माझ्या डोळ्यांपुढे अंधार आला होता. माझी मान उजवीकडे वळली होती आणि माझा डावा गाल जड झाल्यासारखा वाटला.
हो, श्रेयाने माझ्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली होती. मी मान सरळ करून निर्लज्जासारखे तिच्याकडे पाहिले आणि एका नंतर एक थप्पड माझ्या गालावर पडत राहिल्या.
ती दारात पाहिल्यापासून माझे अंग सुन्न पडले होते. आता माझ्या गालावर एवढ्या थप्पड मारल्यानंतर ती काय बोलत होती, मला काहीही ऐकायला येत नव्हते. मी फक्त एक पुतळा बनून उभा होतो.
ती रागाने ओरडत होती. रूममध्ये इकडून तिकडे फिरत होती. माझ्या रूममधील सामान फेकत होती. शेवटी, मला इतकेच कळले की, ती रडत रडत माझ्या जवळ आली आणि माझ्या तोंडावर थुंकून रागारागात बाहेर निघून गेली.
मी तिला रोखू शकलो नाही. माझे हातपाय हलवायची ताकदही माझ्या उरली नव्हती. श्रेयासोबत असलेले माझे नाते तुटले होते. ती आता आयुष्यभर माझे तोंड पाहणार नव्हती.
तेवढ्यात कार्तिक माझ्या समोर आला आणि आपला रुमाल काढून माझे तोंड पुसू लागला. माझे तोंड पुसल्यावर तो मला मिठी मारण्यासाठी पुढे आला.
पण कोणास ठाऊक? माझ्यात कुठून एवढी ताकद आली की, त्याचा हात पकडून मी त्याला ओढत दरवाजापर्यंत नेलं आणि बाहेर लोटून दरवाजा आतून बंद केला आणि दरवाजाला पाठ टेकवून रडायला लागलो.
मी खरंच चुकलो होतो. एकीकडे श्रेयाने माझ्याशी असलेले दोन वर्षांपासूनचे नाते तोडले तर दुसरीकडे शिखाने आपल्या प्रियकरासोबत असलेले वर्षभरापासूनचे नाते तोडले.
दुःख अनावर होत होतो. क्षणाक्षणाला वाटत होते की कुठेतरी जाऊन जीव द्यावा. पण तिथून उठून उभं राहण्याची ताकदही आता माझ्या अंगात उरली नव्हती.
मी किती वेळ रडत होतो, माहिती नाही. माझा ब्लाउज उघडा होता, साडी विस्कटली होती, अश्रूंनी चेहऱ्यावरचा मेकअप खराब झाला होता. या अवस्थेत मी दरवाजाला पाठ लावून बसलेलो होतो.
तेवढ्यात माझी नजर त्या गुलाबाकडे गेली, जो तो माझ्यासाठी घेऊन आला होता. तो माझ्या शेजारी पडलेला होता. कदाचित, श्रेया वस्तू फेकत होती तेव्हा तो इथे पडला असावा. त्याच्या पाकळ्यादेखील पडल्या होत्या. त्याची आणि सारखीच माझी अवस्था होती.
तो गुलाब मी उचलला आणि माझ्या छातीला कवटाळून रडू लागलो. काही वेळेपूर्वी सर्व काही गोड स्वप्नासारखे सुखद वाटत होते. पण आता माझे काचेचे स्वप्न माझ्यासमोर तुटले होते आणि डोळे उघडल्यावरही त्याच्या जखमा माझ्या अंगावर जाणवत होत्या.
मी आता शांत झालो होतो. अचानक मला माझ्या साडीत ओलं जाणवलं आणि माझी नजर तिथे गेली, जिथे काही वेळेपूर्वी मी उभा होतो.
तिथे पाणी जमा झाले होते. नक्कीच ते पाणी नव्हते, तर मी साडीत लघवी केली होती. श्रेयाने जेव्हा पहिली थप्पड माझ्या गालावर लगावली, तेव्हाच मी फळाफळा मुतलो होतो.
क्षणाक्षणाला मला शिखावर राग येत होता. जर मी शिखाला ताब्यात ठेवलं असते तर हा दिवस आलाच नसता. पण आता पश्चाताप करण्याची वेळ नव्हती. मी रांगत बेडजवळ गेलो आणि फोन उचलला.
नेट चालू करताच मला मेसेंजरच्या नोटिफिकेशन दिसल्या. जयने मेसेंजरवर सॉरीचे १५ मेसेज पाठवले होते. मी चेक करायला मेसेंजर उघडले तर मला त्याची प्रोफाईल दिसली नाही.
आता विचार करण्यात मला वेळ घालवायचा नव्हता म्हणून व्हॉट्सअॅप उघडले आणि श्रेयाला ‘सॉरी’ असा मेसेज केला. ती ऑनलाईन होती. तिने लगेच मेसेज पाहिला. ती काय रिप्लाय करते, म्हणून मी फोनकडे पाहत होतो, तेवढ्यात मला फोनपेवर एक नोटिफिकेशन आली.
श्रेयाने मला १० रुपये पाठवले होते! पण का? तिने मला पैसे का पाठवले? हे विचारण्यासाठी मी पुन्हा व्हॉट्सअॅप तेवढ्यात श्रेयाचा मेसेज आला.
‘हीच तुझी लायकी आहे.’
मला काही कळले नाही. तितक्यात तिने मला फोनपेवर १० रुपये पाठवल्याचा स्क्रीनशॉट आणि ट्रेनमध्ये टाळ्या वाजवून पैसे मागणाऱ्या छक्क्याची क्लिप पाठवली! मी मेसेज पाहिल्यावर पुढे काही टाईप करणार इतक्यात व्हॉट्सअॅप बंद झाले. मी पुन्हा व्हॉट्सअॅप उघडले, तर तिने मला ब्लॉक केलेले होते.
मी तिला कॉल केला आणि मी काही बोलायच्या आधीच श्रेया फणकार्यात बोलली, “माझ्या भावाकडून झालेली चूक मला मान्य आहे. त्याने मला सगळं सांगितलं आहे. या पुढे मला किंवा माझ्या भावाला फोन करायची किंवा भेटायची गरज नाही. मी माझा भावाची प्रोफाईल जप्त केली आहे. त्यामुळे आता तुझे सगळे उघडे नागडे फोटो आणि चाट माझ्याकडे आहे. जर तू माझ्यासमोर देखील आलास तर मी हे सर्व व्हायरल करून देईल.”
आणि फोन कट केला.
मी पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने मला ब्लॉक केले.
श्रेया मी तुला कसं सांगू की, मी छक्का नाही तर मी फक्त एक क्रॉस ड्रेसर आहे! मला साडी नेसायला आवडते म्हणून तू माझी तुलना ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या छक्क्यासोबत कशी करू शकते?
गेल्या दोन वर्षांत मी शिखाबद्द्ल तुला सगळं सांगितले होते, तेव्हा तू निदान एकदा तरी मला माफ करू शकशील का? एकदा तरी माझं मन समजून घेऊ शकशील का?
पण हे ऐकायला श्रेया माझ्या जवळ नव्हती किंवा ती ऐकणारही नव्हती!
(क्रमशः)