मी एका कॉफी शॉपमध्ये बसून पाच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांच्या आठवणींत मग्न होतो. माझ्या आयुष्यात सर्व काही खूप चांगले होते. श्रेया नावाची एक सुंदर मैत्रीण होती, एक महागडी बाईक होती, चांगली नोकरीची होती आणि बऱ्याच मुली माझ्यासाठी रांगेत उभ्या होत्या.
पण सहा महिन्यापूर्वी सर्व काही विस्कटले. काही महिने नैराश्य राहिले, पण नोकरीत रूजू होताच मी त्यातून सावरायला सुरूवात झाली. याच दरम्यान श्रेयाचे लग्न झाले. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. ते दुःख हृदयात घर करून गेले. पण मी तेही सहन केले.
गेल्या सहा महिन्यात अशा कितीतरी वाईट घटना घडल्या होत्या, ज्याची मी माझ्या आयुष्यात कधीही कल्पना केली नव्हती की, माझ्यासोबत असे काही घडेल आणि मी त्याला सामोरे जाऊ शकेल.
तो वाईट काळ आठवून माझे मन भीतीने भरले होते तेव्हा मी गेल्या पाच वर्षापासूनच्या आठवणीत मग्न झालो होतो. ते माझ्या आयुष्यातील सुंदर क्षण होते, ज्यांना पुन्हा जगण्याची माझी इच्छा होती.
सुमारे साडे तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांनी माझा आत्मा, माझ्या आवडी निवडी, माझी विचारसरणी, सर्व काही बदलले होते.
काही वर्षांपूर्वी मला स्वतःसाठी ‘हॅण्डसम’, ‘हिरो’, ‘चॉकलेट बॉय’, ‘कूल ड्यूड’ हे शब्द ऐकून अभिमान वाटायचा, पण आता मी स्वतःसाठी ‘रापचिक’, ‘छम्मकछल्लो’, ‘माल’, ‘हॉट’, ‘जानू’, ‘ब्युटीफुल’ असे शब्द ऐकायला उत्सुक आहे.
हो! मला आता क्रॉस ड्रेसिंग आवडते!
काही वर्षांपूर्वी, मी जिममध्ये घाम गाळून कमावलेले माझे दंड दाखवण्यापेक्षा, मला आता बॅकलेस ब्लाउजमध्ये माझी उघडी पाठ बघायला आणि दाखवायला आवडते.
मजबूत दंड आणि भरीव छाती दाखवून मुलींना भुरळ घालण्या ऐवजी, अर्धपारदर्शक साडीत माझी सडपातळ कंबर आणि बॅकलेस ब्लाउजमध्ये उघडी पाठ दाखवून पुरूषांना मोहित करायला आवडते.
मनगटात मोठे घड्याळ घालण्या ऐवजी हातभर बांगड्या घालून त्यांची किणकिण ऐकण्याची माझी इच्छा आहे. आता मला माझी भारदस्त छाती टाईट बनियानमध्ये दाखवायची नाही, तर ब्रा आणि ब्लाउज घालून साडीच्या पदराने माझे कोवळे स्तन झाकण्याची इच्छा आहे.
त्या वेळी मला मस्त वाटणारा स्पाइक हेअरकट आता नकोसा वाटतोय. आता आरशात बघून माझी इच्छा होते की कंबरेपर्यंतचे केस असावेत व माझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या बटा मी माझ्या नेलपॅन्टने रंगवलेल्या बोटांनी परत परत माझ्या कानामागे कराव्यात आणि त्याच वेळी माझ्या हातातील बांगड्यांची किणकिण माझ्या कानावर पडावी.
पण मग माझे लक्ष माझ्या कानांच्या दोन्ही छिद्रांकडे जाते आणि मी निराश होतो. माझे कान किती रिकामे वाटताय! हो, मला माझ्या दोन्ही कानात छिद्रं आहेत. काही वर्षांपूर्वी मी माझे कान टोचून घेतले होते आणि माझ्याकडे सुंदर सुंदर झुमके होते, जे मी कानात घालत असे.
पण आता मला ते छिद्रं पुन्हा सुंदर सुंदर झुमक्यांनी भरायचे आहेत. माझ्या हलणाऱ्या डोक्यासोबत जेव्हा ते झुमके हलतील तेव्हा मला त्यांचा गोड स्पर्श माझ्या गालावर आणि मानेवर अनुभवायचा आहे.
माझे आवडते वुडलँडचे शूज आता माझ्या पायात जड वाटतात. चालताना त्यांचा ठसठशीत आवाज ऐकू आला की असे वाटते, त्यांना लगेच काढून फेकून द्यावं आणि त्यांच्या जागी नाजूक पैंजण आणि हिल्स घालावी.
चालताना पायातल्या पैंजणचा ‘छमछम’ आणि हिल्सचा ‘टिक टॉक’ आवाज जेव्हा एकाच वेळी माझ्या कानावर पडायचा तेव्हा किती आत्मविश्वास वाटायचा मला!
आता डोळ्यांवर रे-बॅनचा चष्मा नसून डोळ्यांत काजळ असते तर किती छान वाटले असते! कपाळावर छानशी एक टिकली आणि ओठांवर लाल लिपस्टिक असती तर खरंच मी किती सुंदर दिसली असते!
पण सहा महिन्यांपूर्वी मी क्रॉस ड्रेसिंग सोडून पुरूषासारखं जगायचं ठरवलं होतं. तेव्हा मला माझ्या स्त्रीत्वाच्या भावनेचा राग अनावर झाला होता. पण आज पुन्हा तेच स्त्रीत्व अनुभवण्यासाठी मी तळमळत आहे.
मला पुन्हा साडी नेसण्याची इच्छा आहे. माझ्या खांद्यावरून खाली सरकणारा पदर मला पुन्हा पुन्हा सावरायचा आहे. मला माझी नाजूक कंबर मटकवत मटकवत चालायची इच्छा आहे.
चालताना पायाच्यामध्ये येणाऱ्या माझ्या साडीच्या निऱ्या मला सांभाळायच्या आहेत. चालताना मला माझ्या हातातील बांगड्यांची किणकिण आणि पायातील पैंजणांची छमछम मला पुन्हा ऐकायची आहे.
कोणी तरी माझी स्तुती करावी आणि मी लाजून मला माझ्या पदराशी खेळावं, असं मला सारखं वाटते. गेल्या सहा महिन्यांपासून माझे कान, कोणी तरी मला ‘शेखर’ नाही तर ‘शिखा’ म्हणून हाक मारावी, यासाठी उत्सुक आहेत.
पण, आता ते शक्य नाही! माझ्या डझनभर साड्या, ब्लाउज, परकर, ब्रा, पॅन्टी, नाईटी, सलवार कमीज, ओढण्या, मेकअप आणि दागिने, सगळं समान, सहा महिन्यांपूर्वी माझ्यातील पुरूषाने नष्ट केले आहे.
माझ्यातील पुरूषाने माझ्यातील स्त्रीत्वावर केलेला हा एक मोठा हल्ला होता. माझ्यातील स्त्रीने मग पुढील बरेच दिवस माझ्या पुरूषत्वाचा द्वेष केला, त्यामुळे स्वतःची समजूत काढायला आणि माझे पुरूषत्व परत मिळवायला मला खूप वेळ लागला.
पण आता मला या गोष्टीचा खरंच पश्चाताप होतोय! जर सहा महिन्यांपूर्वी मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर मी स्वतःला समजावले असते की मला माझ्या स्त्रीत्वाचा कधीच तिरस्कार नाही.
कदाचित, मी यावेळी एका स्त्रीच्या रूपात साडी नेसून बसलेली असतो. या कॉफी शॉपमधील कितीतरी मुले माझ्याकडे तोंडातून लाळ टपकावत बघत असते आणि मी एका स्त्रीप्रमाणे लाजलो असतो.
हो, मला तेव्हा माझ्या स्त्रीत्वाचा तिरस्कार वाटत होता, पण आता मला ते पुन्हा हवे आहे. माझ्यातील पुरूषाने आपल्या पुरूषी अहंकाराच्या तुरूंगात कैद केलेल्या स्त्रीला पुन्हा मुक्त व्हायचे आहे. या विचाराने माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते आणि माझे मन आणखी अस्वस्थ झाले.
मी नोकरीच्या निमित्ताने मुंबईत राहत होतो. स्वतः चा फ्लॅट होता. पण एकटा राहत असल्याने, गेल्या सहा महिन्यापूर्वीच्या आठवणी डोळ्यांसमोर यायच्या आणि घर मला गिळायला पहायचे.
सुट्टीच्या दिवशी तर आणखी अस्वस्थ व्हायचे म्हणून आज मी या कॉफी शॉपमध्ये येऊन बसलो होतो आणि माझ्या आयुष्यातील गोड क्षण आठवण्याचा प्रयत्न करत होतो.
(क्रमशः)