वहिनी मला नेसवण्यासाठी आपल्या अंगावरील गुलाबी साडी फेडायला लागली. माझी नजर ब्लाउजमध्ये उभ्या असलेल्या वहिनीच्या रूपाकडे गेली. पण क्षणार्धात ती साडी नेसण्याची कल्पना माझ्या डोक्यातून निघून गेली आणि माझे मन भीतीने भरले.
“चल शिखा, तूही तुझे कपडे काढ. त्या समोरच्या ड्रॉवरमधून गुलाबी ब्रा पॅन्टी घे आणि घालून ये.”
वहिनीने तिची अर्ध्याहून अधिक साडी फेडली होती. ती खराब होऊ नये म्हणून वहिनी सावकाश ती फेडून बेडवर टाकली होती. आता ती परकरमधून साडीचा शेवटचा भाग काढत होती.
वहिनीचे शब्द ऐकून खरं तर मला पुन्हा आनंद व्हायला हवा होता. पण तिच्या तोंडून ‘शिखा’ नाव ऐकून आता मला धक्काच बसला!
सकाळपासून कोणी तरी मला शिखा म्हणून हाक मारावी यासाठी माझे मन तळमळ करत होते. पण मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझी वहिनीच मला शिखा म्हणेल.
सहा महिन्यांनंतर मला कोणी शिखा म्हटले या गोष्टीचा आता आनंद होण्याऐवजी मी भीती आणि काळजीत हरवून गेलो होतो.
माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. कदाचित, माझ्या शिखा नावाच्या फेसबुक आयडीबद्दल वहिनीला कळले असावे किंवा चुकून तिने माझ्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये साडी नेसून मादक पोझ देतानाचे फोटो पाहिले असावेत. म्हणूनच तिने मला ‘शिखा’ नावाने हाक मारली असावी.
वहिनीने तिची गुलाबी साडी फेडून माझ्याजवळ बेडवर ठेवली.
“अग शिखा, ड्रॉवरमधून ब्रा पॅन्टी घ्यायला एवढी काय घाबरतेस? माझी वहिनी झाल्यावर तुला पण रोज तेच घालावं लागेल. कळलं?” वहिनीने आणखी एक टोमणा मारला.
मग तिने स्वतःच ड्रॉवर उघडून एक गुलाबी पॅडेड ब्रा आणि त्याला जुळणारी एक नाजूक गुलाबी पॅन्टी काढली आणि माझ्या हातात दिली.
“मी बाथरूममध्ये जाऊन परकर आणि ब्लाउज काढून आणते. तोपर्यंत तू हे घालून तयार हो. मग हेमूलाही बोलवायचं आहे. उशीर करू नकोस, नाही तर आई येईल.” आपल्या हातात एक लाल सलवार कमीज घेऊन बाथरूमच्या दिशेने जाताना वहिनी म्हणाली.
रोज संध्याकाळी पूजा केल्यावर आई अनेकदा कॉलनीतील एका मंदिरात सत्संगासाठी जाते. मी नुकताच आईला तिथे सोडले होते आणि वहिनीला कळवायला आलो होतो की, मी जात आहे. पण कोणास ठाऊक? मी या गोंधळात अडकून, पुन्हा वहिनीच्या साडीच्या आणखी जवळ जाईन.
वहिनीने माझ्या हातात ठेवलेल्या गुलाबी ब्रा पॅन्टीकडे पाहून, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या घटनेची, मला पुन्हा आठवण झाली. माझे डोळे भरून आलेत. मला आता रडायचे होते, खूप रडायचे होते. तेवढ्यात वहिनीच्या आवाजाने माझी तंद्री तुटली.
बाथरूममधून बाहेर पडल्यावर तिने तिचा गुलाबी परकर आणि ब्लाउज माझ्या शेजारी साडीवर ठेवला आणि म्हणाली, “काय गं शिखा, अशी कशी तू? एवढी मोठी झालीस आणि अजून तुला ब्रा घालता येत नाही?”
ती माझ्या समोर उभी राहिली आणि तिचे दोन्ही हात कमरेवर ठेवून खोडकरपणे म्हणाली, “काय गं? कसं होईल बाई तुझं, देव जाणे!”
या वेळी माझे लक्ष तिच्या बोलण्याकडे किंवा सलवार कमीजकडे गेले नाही. कारण मी स्वतःच्या भूतकाळात इतका हरवलो होतो की माझी मान वर करून तिच्याकडे बघण्याची माझी हिंमतच होत नव्हती.
वहिनी कपडे बदलून आली होती. तिच्या अंगावरची साडी मला नेसायची होती म्हणून तिने ती माझ्यासाठी माझ्यासमोर फेडली होती आणि माझ्या शेजारी ठेवली होती.
नुसती साडी नाही तर तिने स्वतःहून आपली गुलाबी ब्रा पॅन्टी माझ्या हातात दिली होती. याशिवाय तिने आपल्या अंगावरील गुलाबी ब्लाउज आणि परकर काढून माझ्या शेजारी बेडवर ठेवले होते, जे मला घालायचे होते.
आता माझी बेडवर ठेवलेली साडी नेसण्याची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. जेव्हापासून वहिनीने बाथरूममधून येऊन तिचा परकर आणि ब्लाउज साडीवर ठेवला, तेव्हापासून ते घालण्यासाठी माझे हृदय धडधडू लागले होते. पण सहा महिन्यांपूर्वीची घटना आठवल्याने माझे मन भीतीने भरले होते.
“आता ब्रा सुद्धा मलाच घालून द्यावी लागेल, असे वाटते.” असे म्हणत वहिनी माझ्या जाकीटचे बटण काढण्यासाठी खाली वाकली.
वहिनीने असे करताच माझ्या अश्रूंचा बांध फुटला आणि मी जोरजोरात रडू लागलो. मला रडताना पाहून वहिनीने पटकन माझा चेहरा तिच्या दोन्ही हातात घेतला.
“काय झालं? तू का रडत आहेस? शश्शश्श!! शांत हो!” वहिनी माझे अश्रू पुसून गंभीर आणि काळजीने बोलली, “शांत हो. मी तुला साडी नेसवत नाहिये, रडू नको.”
हे माझं रडणं मला साडी नेसायची नाही म्हणून आहे, असे वहिनीला वाटलं. पण मी सहा महिन्यांपूर्वीची ती घटना आठवून रडत होतो.
खरं तर मला ती साडी कुठल्याही किंमतीत नेसायचीच होती. ज्या साडीसाठी माझे मन पेटले होते, ती साडी माझ्या शेजारी होती. ज्या प्रकारच्या ब्रामध्ये मला माझे स्तन असल्याची सुंदर भावना जाणवाती, तशीच ब्रा माझ्या हातात होती.
आजचा दिवस वेगळा होता, आज मी स्वतःला क्लीन शेव्ह करण्यापासून रोखले नाही, बाथरूममध्ये कपाळावर टिकली लावण्यापासून रोखले नाही. पण इच्छा असूनही माझे अश्रू मला ती साडी नेसण्यापासून रोखत होते.
वहिनीला मी शिखा असण्याचे सत्य कळले तर घरच्यांनाही कळेल. मग मी सर्वांना कसा सामोरे जाईन? आता या वेळी मी वहिनीला कसं सांगू की, “वहिनी, मला ही साडी नेसायची खूप इच्छा आहे. मी शेखर नाही तर मनाने स्त्री झालो आहे, मी शिखा आहे.”
या सर्व गोष्टी माझ्या मनात एकाच वेळी चालू होत्या आणि मला काय करावे, हे देखील कळत नव्हते. म्हणून वहिनीने माझ्या जॅकेटची झिप उघडताच मी असहाय्यतेने रडायला लागलो. एका स्त्रीच्या रूपात नटण्याची माझी अनेक महिन्यांपासूनची तळमळ होती, जिला आता अश्रू फुटले होते.
गेल्या सहा महिन्यांपासून मी माझ्यातील स्त्रीच्या इच्छा आणि स्वप्न माझ्या पुरूष देहात कैद केले होते. पण आज माझ्या शेजारी तिची आवडती साडी होती, हातात तिची आवडती ब्रा पॅन्टी होती, त्यामुळे डोळ्यांतून वाहणार्या अश्रूंसोबत तिला आता त्या कैदेतून मुक्त व्हायचं होतं.
(क्रमशः)