वहिनी आणि माझे काहीसे असेच आंबट गोड नाते होते. लग्नानंतर ती आमच्या घरी आली तेव्हा सुरूवातीचा काही काळ मी तिच्याशी बोलायला लाजत असे. ती मला जास्त कठोर आणि स्वतःबद्दल स्वार्थी स्त्री वाटत होती. पण ती माझी चूक होती.
हळूहळू मला कळले की ती खूप गोड, प्रेमळ आणि आईसारखी काळजी घेणारी आहे. आमचं नातं मैत्रीच्या नात्यासारखं घट्ट होतं. ती माझ्यापेक्षा तीन वर्षांने मोठी होती. आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे आमच्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो.
घरच्यांसमोर ती मला नेहमी ‘भावजी’ म्हणायची आणि एकट्यात ‘शेखर’ म्हणायची. मी तिला नेहमी ‘वहिनी’ म्हणायचो. आम्ही अनेकदा एकांतात मनमोकळेपणाने बोलायचो.
मी घरी आलो की कुठल्या ना कुठल्या कारणाने मला तिची बडबड सहन करावी लागायची. आज जसे ती मला क्लीन शेव्हमध्ये पाहून मुलगी किंवा सून झाल्याबद्दल बोलत होती, तशीच अलीकडेच एके दिवशी ती, माझ्या एका मैत्रिणीमुळे, दिवसभर मला चिडवत होती.
वहिनी नेहमीच माझ्या खोड्या करायची, त्यामुळे आता जेव्हा वहिनीला माझा धक्का लागला, तेव्हा मला या गोष्टीबद्दल विचित्र वाटले नाही.
ती माझी खूप चांगली मैत्रीण होती, त्यामुळे तेव्हा मला तिला, तू नेसलेली हीच साडी काढ आणि लगेच मला नेसव, असे म्हणण्यात संकोच वाटला नाही. माझ्या मनात तिच्याबद्दल कुठलाही वाईट हेतू नाही, याची तिला खात्री होती.
आरती संपल्यावर आईने प्रसादासाठी माझ्याकडे ताट आणले. वहिनी अजूनही माझ्याकडे प्रेमळ रागाने बघत होती. मी प्रसाद घेतला तेव्हाही तिची नजर फक्त माझ्याकडेच होती. मला खात्री होती की आता ती माझी चांगलीच टेर खेचेल.
“रूपाली, सर्व आवरून घेशील.” असे म्हणत आई आपल्या रूमकडे गेली.
माझी नजर माझ्या आईकडे होती. तेवढ्यात मागून वहिनीने मला “कुत्रा!!” म्हणत माझ्या नितंबावर चापट मारली आणि स्वतःच “आउचऽऽ” म्हणत वेदनेने ओरडत माझ्या हाताला धक्का देऊ लागली.
मग स्वतःच्या हाताच्या मनगटाकडे बघत ती रडवेल्या आवाजात म्हणाली, “माझी बांगडीही मोडलीस, मेल्या!”
मग तिच्या मनगटातून तुटलेली बांगडी काढून त्याच जखमी हाताने माझा हात पकडून मला रागाने म्हणाली, “तुला साडी नेसायची आहे ना? आता तू बघच.”
मग एका हाताने माझा पकडून ती जमिनीवरून पूजेचे साहित्य गोळा करू लागली.
तिच्या निरागस मुलासारख्या रागीट चेहर्याकडे बघून मला हसू आवरत नव्हते.
“राहू दे, तुला जमणार नाही.” मी वहिनीकडे पाहत हसून म्हणालो.
वहिनी आणखी चिडली. माझा पकडून ठेवलेला हात तिने सोडला आणि आपल्या कंबरेवर ठेवला. मग माझ्या डोळ्यांत बघत ती म्हणाली, “का? का नाही जमणार?”
“कारण तुला एकाच वेळी नणंद आणि सासूचा जाच सहन करावा लागेल.”
“काय? आई माझा जाच करता?”
“हो, मी तुझी नणंद असतो तर आम्ही माय-लेकींनी तुला कधीच तुझ्या माहेरी पळवून लावले असते.” मी लगेच हसत तिथून पळत सुटलो.
काय विचित्र नाते आहे सासू-सूनेचे! जिथे इतर सूना आपल्या सासूला टोमणे देताना थकत नाही, तिथे वहिनीसमोर आईबद्दल काहीही वाईट बोललं की तिला राग यायचा. वहिनी घरात सगळ्यांची लाडकी होती आणि आई सुद्धा आम्हा दोघा भावांपेक्षा तिलाच जास्त माया लावायची.
काही वेळाने मी वहिनीच्या बेडरूममध्ये गेलो.
“वहिनी, मी जात आहे.” मी दारात उभा राहून म्हणालो.
“माझ्याशी बोलू नकोस.”
वहिनी ड्रेसिंग टेबलच्या आरशात बघत आपल्या कानातले झुमके काढत होती.
“मला माहेरी पळवून लावणार होतास ना? आता कशाला आला माझ्याकडे?”
माझे दोन्ही हात माझ्या कंबरेवर ठेवत मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि म्हणालो, “आणि तू मला त्या कुणालची नवरी बनवून सासरी पाठवणार होतीस, त्याचं काय? तेव्हा मला नाही का राग आला? सोड ना ग, मस्करी केली, आता एवढी शिक्षा देशील?”
वहिनीने तिचे कानातले झुमके ड्रेसिंग टेबलवर ठेवले. मग खुर्चीवरून उठून माझ्याकडे वळून माझ्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, “साफ खोटं!! मी तुला नवरी बनवण्याचं कधी बोलले?”
“अरे हो, नवरी नाही, पण सून बनवण्याचं बोलली ना तू?”
“हो, पण सून आणि नवरीमध्ये फरक आहे.” वहिनी बेडवर बसली आणि चेहर्यावर आश्चर्याचा भाव अंत मला म्हणाली, “आता मला समजले! काय गं लाडो, नवरी बनायचंय का तुला?”
मग वहिनी मागच्या बाजूला बेडवर दोन्ही हात ठेवून विसावली आणि आपला खालच्या ओठाचा कोपरा आपल्या दातात पकडून खोडकरपणे हसत मला म्हणाली, “आता कळले की, पूजेच्या वेळी माझा सूड का घेतला जात होता! माझी लाडो, अशा मुलासोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहत होती, ज्याचे अस्तित्वच नाही. अरेरे, खूप वाईट झालं!”
हो, कुणाल अजिबात अस्तित्वात नव्हता. वहिनीने फक्त मला चिडवण्यासाठी ती एक कथा रचली होती. त्या मुलीला कोणी भाऊ नव्हता, ती एकटीच होती.
वहिनीचे शब्द ऐकून माझे अंग शहारले. लाजेमुळे आणि अत्याधिक आनंदामुळे माझ्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. पण तेवढ्यात ती तिला बारीक आवाजात उत्तर दिले, “काही नाही. मला नवरी व्हायचं नाही.”
माझ्या ओठांवर एक हलके लाजाळू हसू उमटले आणि माझे डोळे आपोआप खाली झुकले.
वहिनीने माझा हात धरून मला बेडवर तिच्या शेजारी बसवले. मग आपली मान माझ्याकडे वळवत हसून म्हणाली, “बाई गं!, काय गोड लाजतेस! लाजून गाल किती लाल झाले आहेत.”
मी लाजून खाली बघत होतो.
“अग, कुणाल नसला तरी आपल्याकडे आणखी एक पर्याय आहे.” वहिनी डोळे मिचकावत म्हणाली.
“वहिनी, तुझे पर्याय तुझ्याकडेच ठेव. मला नाही ऐकायचे.”
हे सांगताना माझ्या चेहर्यावर हलके हसू उमटले. कदाचित नववधू बनण्याच्या विचाराने शिखाच्या मनात लाजेने धडकी भरली असावी.
“ऐक ग, हेमू अजून बॅचलर आहे. तू ही साडी नेस, मी लगेच त्याला बोलवते आणि आजच तुझ्या लग्नाचं बोलते.” वहिनी उभी राहिली आणि खांद्यावरून साडी काढत हसत मला म्हणाली.
हेमंत वहिनीचा धाकटा भाऊ आहे. तो माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठा आहे.
मी डोळे वर करून वहिनीकडे नाराजीने बघत म्हणालो, “वहिनी, काहीही नको बोलूस.”
वहिनी आपल्या साडीच्या निर्या सोडवत म्हणाली, “अग, खरंच, माझ्यावर विश्वास ठेव, तो चांगला मुलगा आहे. किती मजा येईल ना, आत्तापर्यंत मी तुझी वहिनी होते, आता तू माझी होशील.” वहिनी जोराजोरात हसत म्हणाली, “माझी शिखा वहिनी.”
वहिनीच्या तोंडून माझ्यासाठी ‘शिखा’ नाव ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो. माझ्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न चमकले. वहिनीला माझे नाव कसे कळते? वहिनीला कळलं का की आधी मी मुलगी म्हणून राहायचो आणि माझं नाव शिखा आहे? मी तिला कधी याबद्दल सांगितले नाही, मग तिला कसं कळलं?
(क्रमशः)