थोड्या वेळाने मला व्हॉट्सअॅपवर नोटिफिकेशन आली. मी पाहिले की, श्रेयाने स्वतःचा एक फोटो पाठवला होता. तिने निळा डेनिम जिन्स व व्हाईट टॉप घातला होता आणि पोनीटेल केली होती.
मी तिच्या फोटोकडे पाहून हलकासा हसलो आणि पुटपुटलो, “लठ्ठ!!”
मग आरशात स्वतःकडे बघत हसत म्हणालो, “मी माझा फोटो पाठवला, तर तू स्वतःला सुंदर म्हणायला विसरशील.”
मनात गोड विचारांचे थैमान उठले होते. मग श्रेयाने जो फोटो पाठवला होता, त्याची नक्कल करत मी सुद्धा त्याच स्टाईलने आरशासमोर पाउट बनवायला सुरूवात केली.
उजव्या बाजूने माझे नितंब आरशाच्या दिशेने दाखवत, माझी कंबर थोडी पुढे करत, माझे हात माझ्या खांद्यावर ठेवून, ओठांचा पाउट करत मी त्याच पोझमध्ये स्वतःचा फोटो काढला.
आरशात स्वतःकडे पाहत मी पुटपुटलो, “श्रेया, तुझ्यापेक्षा जास्त हॉट आणि सेक्सी मुलगी माझ्या समोर साडीत उभी आहे, त्यात तुझ्या जिन्स आणि टॉपचे काय नवल! कधी साडी नेसून दाखव मग कळेल.”
मी आरशात बघत स्वतःला एक फ्लाइंग किस दिला आणि माझ्या स्तनांकडे बघत मी निरागसपणे म्हणालो, “अरे, माझे गोलू मोलू, एवढे बाहेर डोकावून काय बघताय? कधी कोणी सुंदर मुलगी साडी नेसलेली पाहिली नाही का?” आणि हसायला लागलो.
श्रेयाने मला तिचा फोटो पाठवला आणि मीही त्याच पोझमध्ये माझा फोटो काढून कोणाला मेसेंजरवर पाठवला.
किती विचित्र गोष्ट होती की, माझी प्रियसी मला पुरूष समजून तिचे फोटो पाठवत होती, पण मी स्वतः एक स्त्री बनून माझे फोटो कोणाला पाठवत होतो.
मी श्रेयाला बेडवर घेऊन तिला माझं पुरूषत्व दाखवायच्या जागी, मला आता तिला हे सांगायची इच्छा होत होती की, ‘बघ, मी तुझ्यासारखी स्त्री झालो आहे. बघ, मी आता किती सुंदर दिसत आहे.’
एक पुरूष असूनही, मी माझ्या सौंदर्याची तुलना त्या मुलीशी करत होतो, जी माझी प्रियसी होती, जिच्याशी मला लग्न करायची इच्छा होती.
स्त्री रूपात मी तिच्यापेक्षा सुंदर दिसत असलो, तरी मला तिची नक्कल का करावीशी वाटली? हे कळत नव्हते. स्त्री रूपात मी कधीच तिची नक्कल केली नव्हती, त्या दिवशी पहिल्यांदाच तिची नक्कल करत मी, त्या पोझमध्ये, तो फोटो काढला होता.
गेल्या वर्षभरात मी खूप बदललो होतो. एके काळी मी, ज्या मुलीचा फोटो पाहून, हस्तमैथुन करायचो, आता त्याच मुलीचा फोटो पाहून, मला तिच्यासारखीच पोझ देऊन, फोटो काढायची इच्छा झाली.
एके काळी त्या मुलीचे स्तन पाहून माझा पुरूषत्व बेकाबू व्हायचा आणि प्रत्येक फोटोत मला तिचे स्तन आधी दिसायचे. पण आज तिचा फोटो पाहून तिच्या स्तनांवर माझे लक्ष गेले नाही. याउलट माझे स्वतःचे स्तन पाहून मला हेवा वाटत होता.
पूर्वी मी श्रेयाचा फोटो पाहून तिला फ्लाइंग किस पाठवत असे आणि आता आरशात स्वतःला स्त्री रूपात पाहून मी स्वतःला फ्लाइंग किस देत आहे.
श्रेया हे माझे पहिले प्रेम होते. पण आता मी शिखाच्या प्रेमात पडलो आहे. म्हणजेच मी स्वतःच्या प्रेमात पडलो आहे. माझ्या आयुष्यात एक नवीन मुलगी आली होती आणि ती नवीन मुलगी म्हणजे मी स्वतः!
पूर्वी मी श्रेयाचा फोटो तासन तास टक लावून बघायचो. पण आता माझा वेळ आरशासमोर उभं राहून नटण्यात जात आहे.
मी अजूनही माझ्या खालच्या ओठाचा कोपरा दाताखाली दाबून आरशात स्वतःकडे पाहत होतो. मी कधी माझ्या पदराशी, कधी माझ्या लांब केसांशी तर कधी माझ्या कानातल्या झुमक्यांशी खेळत होतो. माझे डोळे आरशात माझे रूप न्याहाळत होते आणि कान बांगड्यांचा आवाज ऐकण्यात गुंग होते. तेवढ्यात काहीतरी आवाज माझ्या कानावर पडला.
कॉलनीच्या गेटजवळ कोणी तरी माझ्याबद्दल काहीतरी कुजबुजत होते, माझे नाव घेऊन चौकशी करत होते आणि वॉचमन त्याला काही तरी सांगत होता. तो आवाज मला ओळखीचा वाटला.
मी पटकन बेडरूममधील बाल्कनीच्या दाराकडे सरकलो, दरवाजाची लॅच सरकवली आणि दार उघडून बाल्कनीत जाऊ लागलो. तेवढ्यात मला अचानक आठवले की, मी साडी नेसलेली आहे, मी शेखर नसून शिखाच्या रूपात आहे. मी घाईघाईने दरवाजा बंद केला आणि मागे सरकलो.
मागील वेळेत कॉलनीत चोर्या खूप वाढल्या होत्या. त्यामुळे नवीन वॉचमन ठेवला होता, जो विनाचौकशी कोणाला आत येऊ देत नसे. त्यामुळे माझी सवय झाली होती की, खाली कोणाचा आवाज आला की, आधी बाल्कनीतून कोण आहे, ते पाहायचे आणि वॉचमनला आत येऊ दे म्हणून सांगायचे.
सवयीप्रमाणे मी त्या दिवशीही तेच करणार होतो. पण त्या दिवशी मी स्त्री रूपात होतो. साडी नेसून, स्त्री बनून, बाल्कनीत जाणे म्हणजे संपूर्ण कॉलनीसमोर माझ्या पुरूषत्वाचा लिलाव करण्यासारखे होते. जर कोणाला कळले असते की, मला एक स्त्री बनण्याची आवड आहे, तर मी कॉलनीत चर्चेचा विषय बनले असतो.
मी काय चूक करणार होतो, या विचाराने माझ्या छातीत धस्स झाले आणि माझा घसा कोरडा पडला. मी माझे दोन्ही हात माझ्या तोंडावर ठेवले आणि घाबरून बाल्कनीच्या दारालाच पाठ टेकवून उभा राहिलो. माझा श्वास जड झाला आणि माझ्या मनात विचारचक्र चालू झाले.
अरे देवा! थोडक्यात वाचलो! मी बाल्कनीत गेलो असतो तेव्हा कोणी मला पाहिले असते का? कॉलनीतल्या आंट्या, ज्या बर्याचदा त्यांच्या घराबाहेर उभ्या राहून एकमेकींशी गप्पा मारत असतात, त्यांनी मला पाहून ओळखलं असतं का?
खरंच मी किती हास्याचा विषय झालो असतो! या समाजात क्रॉस ड्रेसर्सच्या भावनांना काहीच किंमत नाही. मी साडी नेसून बायकांसारखा घरात वावरतो, असे संपूर्ण कॉलनीत आणि इतर ठिकाणीही पसरले असते. माझ्या घरापर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचली असती. मी कोणालाही तोंड दाखवू शकलो नसतो.
माझ्या समोरच्या घरात राहणारी मुलगी, जी अनेकदा बाल्कनीत येऊन तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलते आणि माझ्यावर लाईन मारते, तिने मला असं पाहिलं असतं, तर कॉलनीतल्या प्रत्येक मुलामुलीला तिने सांगितलं असतं की, समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारा मुलगा ‘छक्का’ आहे, मी त्याला साडी नेसलेली पाहिले आहे.
जेव्हा मी माझ्या स्पोर्ट्स बाईकवर स्टाईलने निघतो, तेव्हा कॉलनीतल्या कित्येक मुली माझ्यावर लाईन मारतात. माझ्यामागे गाडीवर बसण्यासाठी माझ्याशी गोड बोलतात. त्याच मुली उद्या माझी चेष्टा करतील. माझा तिरस्कार करतील.
चुकूनही कोणी तरी माझा फोटो काढला असता, तर तो फोटो किती फिरला असता! संपूर्ण कॉलनी, ऑफिस, माझे नातेवाईक, कुटुंब, मित्रमंडळी, सगळ्यांना माझ्या साडी नेसण्याच्या छंदाबद्दल कळले असते.
खाली रस्त्यावर क्रिकेट खेळणारी टवाळ मुले मी बर्याचदा कॉलनीच्या गेटजवळ बसताना पाहिले होते, जर कॉलनीतल्या या मुलांनी मला साडी नेसताना पाहिलं असतं, तर माझं काय झालं असतं?
(क्रमशः)