जवळपास एका वर्षापूर्वी फेसबुकवर माझी त्याच्यासोबत ओळख झाली. माझ्यासारखीच त्यानेही फेसबुकवर खोट्या नावाने प्रोफाईल बनविली होती. त्यामुळे सुरूवातीला मला त्याच्यासोबत बोलताना संकोच वाटे. पण हळूहळू त्याच्या कोमल स्वभावाने मला प्रभावित केले आणि ओळख प्रेमात बदलली.
हो, मी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होतो. पण त्याच्यावर प्रेम करणारा शेखर नाही तर शिखा होती. जेव्हा केव्हा त्याचा मेसेंजरवर मेसेज यायचा तेव्हा शिखा माझ्या शरीरावर आणि मनावर ताबा मिळवायची.
मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. एव्हाना, मी त्याला फक्त त्याच्या फेसबुकवरील नावावरूनच ओळखत होतो. त्या व्यतिरिक्त त्याचे पूर्ण नाव, त्याचे घर, त्याचा व्यवसाय, त्याचे कुटुंब, नातेवाईक, याबद्दल मला काहीही माहिती नव्हते. तरीही कोणास ठाऊक, माझा त्याच्यावर एवढा विश्वास का होता?
त्याच्यासोबत ओळख होण्यापूर्वीपासून मला क्रॉस ड्रेसिंग आवडते. माझ्या वहिनीला लपून पाहत मी साडी नेसायला शिकलो. ती माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर स्त्री होती, जिची मी मनोमन पूजा करायचो.
पण आता मला असं कोणी भेटलं होतं, जी व्यक्ती माझी पूजा करेल. सुरूवातिच्या दिवसात मी त्याला माझ्या क्रॉस ड्रेसिंगच्या छंदाबद्दल सर्व काही सांगितले होते. तोही मला समजून घ्यायचा आणि लगेच माझ्या मेसेजला रिप्लाय करायचा.
हळूहळू आमच्या गप्पा चावट झाल्या आणि आम्ही आणखी जवळ येत गेलो. मग खूप रात्रीपर्यंत मेसेज करणे आणि फोटो पाठवणे सुरू झाले. तो मला त्याचे जिममधील उघड्या अंगाचे फोटो पाठवायचा आणि मी त्याला साडी नेसून अंग झाकताना फोटो पाठवायचो.
त्याने कधीच माझ्या वैयक्तिक आयुष्यात दखल दिली नाही आणि मीही त्याला त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कधीच काही विचारले नाही.
काही महिन्यांपूर्वी, आमचे नाते घट्ट बनले होते. तो नेहमी माझी मस्करी करायचा. मी माझे सेक्स चेंज करावे म्हणून मला प्रोत्साहन द्यायचा किंवा लग्नासाठी माझ्या मागे लागायचा आणि मीही त्याला तसे उत्तर द्यायचो.
आमचे नाते पुढे जाणार, याची मला कल्पना असली तरी आता मी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होतो. अशातच दोन महिन्यांपूर्वी आम्ही भेटायचे ठरवले होते. तो मला कुठेतरी बाहेर नेणार होता. पण त्या वेळी मला ज्याच्यासोबत जायला खूप भीती वाटत होती.
मी आतापर्यंत त्याच्यासोबत फक्त मेसेंजरवर चाट करत होतो, तेव्हा स्वभाव कसा असेल? तो माझ्यासोबत कसा वागेल? या विचाराने माझ्या हृदयात धस्स झाले होते.
त्या दिवशी त्याने मला कॉलनीच्या बाहेर यायला सांगितले होते, जिथे तो बाईकवर माझी वाट पाहत उभा राहणार होता. पण साडी नेसून कॉलनीच्या बाहेर पडणे, हे तितकेच धाडसी काम होते.
मी त्या दिवशी सुद्धा आज ज्याप्रमाणे तयार झालो, तसाच तयार झालो होतो. पण साडी नेसून बाहेर पडायची मला हिंमत होत नव्हती.
तेवढ्यात त्याने, मी बाहेर येत नाहिये म्हणून तो परत चालला आहे, असा मेसेज केला. शेवटी सर्व हिंमत एकवटून मी तोंडाला स्टोल बांधला आणि एका हाताने साडीचा पदर झुलवत आणि दुसर्या हाताने लेडीज पर्स पकडून बाहेर पडलो.
दुपारची वेळ होती, तेव्हा बाहेर सर्व सूनसान होते. गेटवरील वॉचमन सुद्धा झाडाखाली खुर्चीवर बसून घोरत पडला होता. मी जोराजोरात पाऊलं टाकत गेटच्या बाहेर आलो.
तो बाईकवर बसून माझी वाट होता. मी त्याच्याजवळ पोहोचताच त्याला मिठी मारली आणि मला अश्रू अनावर झाले. पण रस्त्यावरून जाणारे लोक पाहून मी कसेतरी माझ्या भावनांना आवर घातले आणि त्याच्या बाईकवर त्याच्यामागे बसलो.
साडी नेसून बाईकवर एका बाजूने पाय करून बसण्याची माझी पहिलीच वेळ होती. मी त्याला घट्ट पकडून ठेवले होते. पण एखाद्या खड्ड्यातून गाडी गेल्यावर, जेव्हा माझी छाती त्याच्या पाठीला लागायची, तेव्हा मला हसू यायचे.
मी पुरूष रूपात अनेक मुलींना माझ्या बाईकवर फिरवले होते. पण आज पहिल्यांदा मी कोणा पुरूषासोबत एक स्त्री बनून त्याच्या बाईकवर फिरत होतो.
त्याने मला शहरापासून दूर एका आईसक्रीम पार्लरमध्ये जिथे मला कोणीच ओळखू शकत नव्हते. माझे रूप सुंदर स्त्रीसारखे होते आणि माझ्या पदराशी खेळत बारीक आवाजात त्याच्याशी बोलत होतो. त्यामुळे पार्लरमधील सगळे लोक आम्हाला प्रेमी युगुल समजत होते.
त्याने दोघांसाठी एकच जम्बो आईसक्रीम बोलावली होती आणि प्रेमाने आपल्या मला भरवत होता. आम्ही बराच वेळ त्या आईसक्रीम पार्लरमध्ये बसलो. यादरम्यान माझा हात त्याच्या हातात होता आणि स्पर्श क्षणाक्षणाला मला सुखावत होता.
त्यानंतर तो मला एका मंदिरात घेऊन गेला. मंदिरातही आम्ही जोडीने दर्शन घेतले, त्यामुळे पुजारी बुवाने मला ‘सौभाग्यवती भवः’ असा आशीर्वाद दिला. त्याने पुजारी बुवाला म्हटले की, अजून आमचे लग्न झाले नाही. त्यावर मी त्याला लाजून म्हणालो की, देवाच्या मनात असेल तर होईल लवकरच! आणि सगळे हसायला लागले.
मंदिराच्या आवारात बसून आम्ही गप्पा केल्या आणि त्याने मला वचन दिले की, आमचे लग्न झाले नाही तरी तो माझी साथ कधीच सोडणार नाही.
मला हा दिवस कधी संपूच नये, असे वाटत होते. पण आता संध्याकाळ होत आली, तेव्हा त्याने मला परत फ्लॅटवर सोडले. त्याला सोडून परत फ्लॅटमध्ये जायचे मन करत नव्हते. म्हणून या वेळी तो मला माझ्या फ्लॅटच्या दारापर्यंत सोडायला आला. या वेळी मी त्याचा हात पकडलेला होता, त्यामुळे मला कसली भीती नव्हती.
दाराजवळ पोहोचल्यावर त्याने माझ्या गळ्यात एक नेकलेस घातले आणि हळूच माझ्या कानात म्हणाला, “आपल्या पहिल्या भेटीची आठवण, आय लव यु, शिखा.”
मीही त्याला मिठी मारून माझ्या प्रेमाची कबुली देत म्हणालो, “आय लव यु, जय.”
त्यानंतर, काही दिवसांनी तो कामानिमित्त दिल्लीला जात आहे, असे त्याने सांगितले. या काळात तो इतका व्यस्त होता की आमचे नेहमीप्रमाणे चाट करणे बंद झाले होते आणि आमच्यातील दुरावा वाढला होता.
पण याच काळात श्रेयासोबत माझी जवळीक आणखी वाढली होती. त्यामुळे माझ्यातील शेखरने आता श्रेयाला वेळ द्यायचे ठरवले होते.
याच तो चक्क दोन महिन्यांनी फक्त मला भेटायला येणार होता. तसे तो मागच्या आठवड्यातच येणार होता. पण काही कारणांमुळे त्याला येता आले नाही. मी आठवड्याभरापासून त्याची वाट पाहत होतो.
आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी त्याने इतर कुठल्याही पुरूषाप्रमाणे माझा फायदा उचलला नव्हता आणि आपल्या निस्वार्थ प्रेमाची मला कबुली दिली होती म्हणून या भेटीच्या वेळी मी त्याला आपले सर्वस्व अर् पण करायचे ठरवले होते.
कदाचित, याच कारणामुळे सकाळपासून मी उत्तेजित होत होतो. त्याची पुन्हा कधी भेट होईल, हे माहीत नाही, म्हणून मला त्याची ही भेट अविस्मरणीय बनवायची होती आणि त्यासाठीच मी इतका नटत होतो.
(क्रमशः)