काही मिनिटात मी ब्रा पॅन्टीमध्ये तिच्यासमोर उभा झालो. ती वार्डरोबमधून तीच साडी घेऊन आली, जी सकाळी तिच्या अंगावर होती आणि मला घालायची इच्छा होती.
काही तासांपूर्वी ती साडी मी माझ्या कपड्यांवर नेसली होती पण आता वहिनी मला तीच साडी नेसवणार होती.
वहिनीने मला आपल्या हाताने परकर घातला. मग मला ब्लाउज घालण्यापूर्वी माझ्या ब्राच्या पट्ट्या व्यवस्थित केल्या आणि ब्रा आणखी घट्ट केली. त्यामुळे माझे स्तन ब्रामध्ये गच्च भरल्यासारखे दिसत होते. मग तिने मला ब्लाउज घातला आणि हुक लावल्यावर बोटांनी तो व्यवस्थित केला.
मग ती मला ड्रेसिंग टेबल जवळ घेऊन गेली आणि माझी पाठ आरशाकडे करून बसवले. मग ती हळूहळू माझा मेकअप करू लागली. मेकअप पूर्ण झाल्यावर तिने माझ्या एका हातात सहा गुलाबी बांगड्या आणि दुसर्या हातात एक पांढर्या रंगाच्या पट्ट्या असलेली लेडीज वॉच घातली.
मग तिने माझ्या कानात झुमके आणि पायात पैंजण घातले. या व्यतिरिक्त तिच्याकडे आणखी एक वस्तू होती, जिची मला कल्पना नव्हती.
तिच्याकडे एक क्लिप असलेली मोठी नथ होती! तिच्या नाकाचे छिद्र खूप बारीक होते. तसेच तिचे नाक नाजूक होते म्हणून तिने ती घेतली होती. अशा काही नथ माझ्याकडेही होत्या. पण ही खूप खास होती. कारण ही माझ्या लाडक्या वहिनीची होती.
ती नथ माझ्या नाकात घातल्यावर तिने प्रेमाने माझ्या गालावर हात फिरवला. मग तिचे बोट तिच्या डोळ्यांवर फिरवून माझ्या मानेवर एक काजळाचा काळा टीका लावला.
मग तिने मला उभा राहायला सांगितले आणि ती साडी नेसवू लागली. तिने साडीचा एक कोपरा माझ्या परकरामध्ये खोचला. मग माझ्याभोवती साडी गुंडाळून माझ्या खांद्यावर पदर ठेवला.
मग साडीच्या निर्या करून तिने माझ्या परकरमध्ये खोचल्या. मग माझ्या पदराला निर्या करून तो व्यवस्थित माझ्या खांद्यावर ठेवला. मग माझ्या ब्लाउजला खांद्यावर पिन लावून पदर सारका केला.
मग तिने माझा चेहरा आरशाकडे केला. आरशात पाहून मी खूप झालो. ज्या प्रमाणे मी नेहमी नटतो त्यापेक्षा मी वेगळा दिसत होतो. वहिनीने एका तरूण मुलीसारखे मला नटवले होते.
आज पहिल्यांदा मी कोणा दुसर्याचे कपडे घातले होते आणि मेकअप वापरला होता आणि व्यक्ती दुसरी कोणी नसून माझी लाडकी वहिनी होती. त्यामुळे मला काहीही विचित्र वाटत नव्हते.
सहा महिन्यांनी मी पुन्हा अशाप्रकारे नटेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. वहिनी माझ्या मागे उभी होती. तिने माझ्या साडीचा पदर उचलून माझ्या डोक्यावर ठेवला आणि माझ्या गालाला गाल लावून आरशात पाहू लागली.
रात्रीचे पावणे दोन वाजले होते. आरशात आम्ही माय-लेकीसारखे दिसत होतो. आपल्या वयात आलेल्या मुलीला सजवून तिच्या डोक्यावर पदर ठेवून एक आई तिच्या गालाला गाल लावून आरशात पाहते अगदी त्याच पोझमध्ये आम्ही होतो.
तितक्यात वहिनी काही आठवले आणि तिने आपल्या गळ्यातील नेकलेस काढून माझ्या गळ्यात घातले. हो, हे तेच नेकलेस होते जे मी तिला सहा महिन्यांपूर्वी दिले होते.
“ते नेकलेस आणि त्या आठवणी त्याच दिवशी नष्ट झाल्या आहेत. आता तू यापुढे कधीच स्वतःला एकटे समजायचे नाही. आजपासून तू माझी मुलगी आहेस. हे नेकलेस मी आजच्या दिवसाची आठवण म्हणून माझ्या मुलीला, माझ्या शिखाला, देत आहे. या नेकलेसवर फक्त माझ्या शिखाचा हक्क आहे.” असे म्हणून वहिनीने माझ्या गालाचे चुंबन घेतले.
“थॅन्क यु, वहिनी.” असे म्हणून मी तिला पुन्हा मिठी मारली.
तिनेही आपले हात माझ्या पाठीवर नेले आणि ती माझ्या कानात म्हणाली, “वहिनी नाही, मॉम! आजपासून एकट्यात तू मला ‘मॉम’ म्हणायचे कळले का?”
“हो, मॉम. कळले.” मी हसत म्हणालो.
त्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत तिने माझे वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढलेत आणि मीही तिला माझे जुने फोटो दाखवलेत.
वहिनीसोबत घालवलेले ते क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होते. आयुष्यात पहिल्यांदा खर्या अर्थाने कोणी तरी मला समजून घेतले होते. माझ्या वहिनीने मला आपली मुलगी बनविले होते. आता मी शिखा होते.
मेकअप काढल्यावर वहिनीने मला घालायला आपली एक नाईटी दिली. रात्री चार वाजता आम्ही आपापल्या रूममध्ये झोपलो.
सकाळी आठ वाजता वहिनी माझ्या रूममध्ये मला उठवायला आली आणि सकाळी उठल्याबरोबर मी तिला ‘मॉम’ अशी हाक मारली आणि तिनेही माझ्या ओठांवर मला मॉर्निंग कीस दिली.
त्यानंतर वहिनीने मला अंघोळ करून लवकर खाली यायला सांगितले. मी अंघोळ केली तेव्हा वहिनीची ब्रा पॅन्टी माझ्या अंगावर होती आणि माझी ओली अंडरवेअर अजूनही त्या प्लास्टिकच्या पिशवीत होती.
मी टॉवेल गुंडाळून बाहेर आलो तेव्हा वहिनी समोर उभी होती. तिच्या एका हातात मी रात्री घातलेली तिची नाईटी होती तर दुसर्या हातात काळ्या रंगाची ब्रा पॅन्टी होती.
तिने ती काळ्या रंगाची ब्रा पॅन्टी माझ्या हातात दिली आणि मी तिला, “थॅन्क यु, मॉम.” म्हटले.
मग तिने बाथरूममध्ये जाऊन ती ओली ब्रा पॅन्टी घेतली आणि दरवाजातून बाहेर गेली.
मी पटकन ती काळ्या रंगाची ब्रा पॅन्टी घातली आणि त्याच्यावर आपले कपडे घालून तयार झालो. मी खाली नाश्ता केला आणि आई आणि वहिनीला, आता मी परत फ्लॅटवर जातो म्हणून सांगितलं. वहिनी किंचित नाराज होती. कालच तिला आपली मुलगी मिळाली होती आणि आता ती पुन्हा दूर जाणार होती.
मी बाहेर येऊन बाईकवर बसलो तेव्हा वहिनी एक बॅग घेऊन माझ्या जवळ आली आणि हळूच मला म्हणाली, “शिखासाठी तिच्या मॉमकडून गिफ्ट.”
मी बॅग उघडून पहिले तर त्यात दोन साड्या, परकर, ब्लाउज, मेकअप, काही दागिने, ४ मुलायम नाईटी, चार जोड ब्रा पॅन्टी, एक सलवार कमीज आणि ओढणी होती.
“मॉम, एवढं सगळं?”
“मी अजून देणार होते पण माझ्याकडे मोठी बॅग नव्हती.” वहिनी हसत म्हणाली.
मी तिला “थॅन्क यु, मॉम.” असे म्हटले आणि तिने प्रेमाने माझ्या गालावरून हात फिरवला.
तेवढ्यात माझी आई माझ्या जवळ आली.
“काय गं रूपे, एवढं काय दिलंस बॅगभरून?” आईने वहिनीला विचारले.
“माझ्या साड्या दिल्या!” असे म्हणून वहिनी हसायला लागली.
त्यावर आई पण मस्करी करत म्हणाली, “शेखर, वहिनीने खूप प्रेमाने साड्या दिल्या आहेत. कपडे खराब झाले की साडी नेसशील हं, बेटा!”
आई निरागसपणे म्हणाली. कारण तिला वाटले की, वहिनीने मला काही तरी खाऊ दिला असेल. पण तिला कल्पना की वहिनीने मला खरंच साड्या दिल्या आहेत आणि फक्त साड्या दिल्या नाहीत तर आणखी खूप काही दिले आहे.
आता माझे कपडे लवकर खराब होणार नाहीत कारण वहिनीने दिलेलेच कपडे मी घालणार आहे. आता माझी काळजी करायला माझी आई तर होतीच पण आता माझ्याकडे एक मॉम आहे. आणि आता मी बायल्या नाही तर माझ्या आईचा शेखर आणि माझ्या मॉमची शिखा आहे!
जेव्हा मी बाईक चालू करून निघालो तेव्हा मी बाईकच्या आरशात मागे पाहिले. आई आणि वहिनी दोघींनी डोळ्यांना पदर लावला होता.
त्या दिवशी नंतर मी फक्त माझ्या वहिनीसाठी नटायचो. आम्ही व्हिडीओ कॉलवर किती वेळ गप्पा करायचो आणि सोबत नटायचो. जेव्हा केव्हा ती शॉपिंगला जायची तेव्हा ती मला शिखा बनवून आपल्यासोबत न्यायची.
शॉपिंग करताना, ‘हे नको घेऊ, ते नको घेऊ’, असे म्हणत ती मला दाटायची आणि मी सुद्धा तिला ‘मॉम’ म्हणत हट्ट करायचो. जेव्हा आजूबाजूला कोणी आम्हाला असे पाहायचे तेव्हा दोघे एकमेकांकडे बघून हसायचो.
वहिनीच्या आग्रहावर काही महिन्यांनी मी, निशाशी, त्याच मुलीशी लग्न केले जिचे आई-वडील मला त्या दिवशी बघायला आले होते. माझ्या लग्नानंतरही माझे आणि वहिनीचे आई-मुलीचे नाते अजूनही कायम आहे आणि माझ्या बायकोला माझ्या क्रॉस ड्रेसिंगबद्दल किंवा आमच्या नात्याबद्दल आजपर्यंत मी कधीही काहीही सांगितले नाहिये.
(समाप्त)