आता बाईक चालवताना समोरील आरशात माझ्या क्लीन शेव्ह केलेल्या चेहर्याकडे पाहून काही वर्षांपूर्वी माझ्या वहिनीने मला ‘मुलगी’ म्हणून हाक मारल्याचे आठवले. जेव्हा कधी कोणी मला मुलगी म्हणायचे, तेव्हा त्या सर्व आठवणी परत माझ्या डोळ्यांसमोर यायच्या आणि मला लाजेने बुडून जावेसे वाटायचे.
तेव्हा मला खरंच कल्पना नव्हती की, कोणी फक्त मुलगी म्हटलं म्हणून रागाने लाल होणारा मी, एक दिवस साडी नेसण्यासाठी एवढी तळमळ करेल.
एक दिवस मी माझ्यासाठी साड्या, ब्लाउज, परकर, ब्रा, पॅन्टी, नाईटी, सलवार, कमीज, ओढण्या, दागिने आणि मेकअपचे सामान विकत घेईल व नटून आरशात आपल्या स्त्री रूपाला पाहून संतुष्ट होईल.
आता प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करत होतो की, कोणी तरी मला ‘शिखा’ म्हणून हाक मारावी, माझ्या स्त्री रूपाची स्तुती करावी. बाईक चालवत असताना आता माझ्यातील स्त्री पुन्हा माझ्यावर वर्चस्व गाजवू लागली.
मला आठवू लागले की, जेव्हा सगळे मला ‘मुलगी’ म्हणू लागले, तेव्हा शेवटी मी माझे केस कापले आणि शरीराचा आकार सुधारण्यासाठी जिम सुरू केली. आता मला कोणाच्या पुढे नाजूक आणि कमकुवत दिसायचे नव्हते.
दोन वर्षांत माझे शरीर, माझे हावभाव आणि माझी देहबोली सुधारली आणि माझा आत्मविश्वास गगनाला भिडला. मी आकर्षक आणि देखणा दिसू लागलो. आता मला दाढी-मिशीही येऊ लागली, त्याचाही मला फायदा झाला.
कॉलनीतली जी मुलं मला आधी मुलगी म्हणून चिडवायची, आता मी त्यांना जास्तच देखणा आणि आकर्षक दिसत होतो. आता मी नजर चोरून पळून जात नव्हतो तर मुद्दाम त्यांच्याकडे बघत होतो आणि ते नजर फिरवत होते. पण लहान वयात जिममुळे माझी उंची तिथेच थांबली.
त्या वेळी मी सोशल मीडियावर अनेक मुलींसोबत फ्लर्ट करायचो आणि अनेक मुली माझ्यासोबत फ्लर्ट करायच्या. अशातच मला श्रेया मिळाली. गोष्टी भेटीमध्ये बदलल्या आणि आम्ही प्रेमात पडलो.
अचानक कोणी तरी जोरात हॉर्न वाजवला आणि मी माझ्या भूतकाळातील आठवणीतून बाहेर आलो. मी पुन्हा बाईकच्या आरशात माझा चेहरा पाहिला. पण या वेळी माझ्यातील शिखा शेखरबद्दल विचार करू लागली.
आज जरी माझा चेहरा मुलीसारखा दिसत आहे, आज जरी ते ब्लेझर माझ्यावर वाईट दिसत होते, पण या आधीही मी स्वतःला एक सुंदर देखणा पुरूष बनवले होते.
कधी काळी लोकांच्या नजरेत मी एक मुलगी होतो, पण तेव्हा त्यांना सिद्ध करून दाखवले की मी देखणा मुलगा आहे. मी हे आधीही केले आहे आणि आताही करू शकतो!
शेखर आणि शिखा यांच्यातील भांडण सोडवत मी शेवटी घरी पोहोचलो. मी दारात बाईक उभी केली. नेहमीप्रमाणे गेट अर्धे उघडे होते.
गेट उघडताच मी हाक मारली, “आई कुठे आहेस?”
वरून आईचा आवाज आला, “शेखर, वर ये बेटा.”
मी वरच्या मजल्यावर पोहोचलो. आई ड्रॉईंग रूममध्ये सोफ्यावर बसली होती. मला पाहून ती किंचाळली.
“मी तुला सांगितले होते की, काहीही घालून येऊ नकोस म्हणून, हे काय घातले आहेस?”
मी पुढे काही बोलायच्या आधीच वहिनी तिच्या बेडरूमच्या गॅलरीतून माझ्यासमोर आली आणि म्हणाली, “आई, कपडे सोडा, चेहरा बघा कसा तू गुळगुळीत केला आहे. मला तर वाटते, ते लोक आता जावई बघायला येत आहेत पण सून पसंत करून जातील.” वहिनी हसायला लागली.
वहिनीकडून जे अपेक्षित होते तेच तिने केले. पण यावर काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझ्या तोंडातून बाहेर पडलं, “काय?? मला बघायला येत आहे?”
“हो, म्हणूनच मी तुला व्यवस्थित कपडे घालून यायला सांगितलं होतं.”
मी काही बोलायला तोंड उघडणार तोपर्यंत वहिनी म्हणाली, “आणि असेही म्हणाल्या होत्या की, क्लीन शेव्ह करू नकोस.”
मी आईच्या पायाजवळ गुडघे टेकून जमिनीवर बसलो.
” पण आई, निदान मला तरी विचारायचे किंवा सांगायचे होते ना!”
आईच्या जागी दुसरे कोणी असते तर, लग्नाचे नाव ऐकून माझ्या चेहर्यावर आलेली चिंता आणि अस्वस्थता, त्या वेळी त्याला कळली असती.
“अरे, यात काय विचारायचे ते सांग? २५ वर्षाचा झाला आहे. कधी न कधी लग्न करावंच लागेल.”
” पण आई…”
रडवेल्या चेहर्याने मी एवढंच बोलू शकलो आणि तिच्या जवळून उठून दुसर्या सोफ्यावर जाऊन बसलो.
“काळजी करू नका, भावजी, त्यांनी तुम्हाला जावई नाही केले तरी चालेल, पण तुम्हाला सून म्हणून पसंत करू नये, एवढीच प्रार्थना.” वहिनी पुन्हा तोंडावर हात ठेवून जोरात हसायला लागली.
आता मी तो सहा वर्षांपूर्वीचा शेखर नव्हतो, ज्याला वहिनी ‘मुलगी’ म्हणून छेडेल आणि आणि मी लाजत गुपचूपपणे उभा राहून तिचं ऐकेल. पूर्वी ‘मुलगी’ हा शब्द मला अस्वस्थ करायचा, अपमान वाटायचा. पण आता मी स्वतःहून मनाने एक स्त्री झालो होतो.
एकदा नाही तर अनेक वेळा मी साडी नेसून नटलो होतो. त्यामुळेच आता मला कोणी मुलगी म्हटले तरी अपमान वाटत नव्हता. लोकांसमोर मी धडधाकट पुरूष असलो, तरी एकट्यात मी एक स्त्री होतो. त्यामुळे, एक स्त्री दुसर्या स्त्रीला कसे उत्तर देते, हे देखील मला माहीत आहे. मी तेच केले!
“तसे असले तरी मला सून बनविणे त्यांच्या नशीबात नाही. त्यांचा मुलगा माझ्यासोबत लग्न करायला ‘गे’ थोडीच असेल? नाही का?” वहिनीकडे बघत मी किंचित हसत म्हणालो आणि वहिनीही मोठ्याने हसली.
“मला माहीत आहे, तू मुद्दाम असं करत आहेस. तुला लग्न करण्याची इच्छा नाही का?” आई रागाने म्हणाली.
“अग, मला कसं माहीत असेल की, मला बघायला येत आहेत म्हणून? मला माहीत असते तर मी आलोच नसतो.” मी नंतरचे शब्द हळूच उच्चारले आणि निराशेने मान हलवली.
“ह्या रूपालीने, तुझ्या लाडक्या वहिनीने, तुला सांगितलं नाही का? काय ग, रूपे?” आईने वहिनीकडे डोके वळवत कडक आवाजात विचारले.
“बाई बाई! मी का सांगू लागली? उलट मीच तुम्हाला सांगितले होते की, भावजीला सांगा की क्लीन शेव्ह करून येऊ नका म्हणून.” वहिनी तिच्या साडीच्या पदराशी खेळत म्हणाली.
मी मन वळवून वहिनीकडे पाहिले आणि माझी नजर तिच्या साडीवर गेली. तिने एक खूप सुंदर गुलाबी रंगाची पार्टी वेअर साडी नेसलेली होती. ती खूप पातळ, हलकी आणि मऊ वाटत होती.
त्या अर्धपारदर्शक साडीच्या कडावर हलके नक्षीकाम केलेले होते. बाकी सर्व काही साधे होते, अगदी पदर देखील! ती खूप महाग असेल, हे साहजिकच होतं. आज पाहूणे येणार आहेत, म्हणूनच आज तिने ही साडी नेसली असावी.
त्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाउजही अप्रतिम दिसत होता. खांद्यावर फक्त इंचभर पट्टी, असा तो स्लीव्हलेस ब्लाउज होता. ब्लाउजला चौकोनी आकाराचा मोठा गळा होता, ज्यातून तिच्या स्तनांमधील घळ स्पष्ट दिसत असावी. कारण वहिनीने साडीच्या पदराने आपले स्तन पूर्णपणे झाकून घेतले होते.
(क्रमशः)