काही वेळाने ते पुन्हा त्याच हॉटेलला येऊन थांबले. या हॉटेलशी त्याच्या खास भावना जोडल्या गेल्या होत्या. याच हॉटेलमध्ये त्यांच्या प्रेमाची पहिली गाठ बांधली गेली होती. आजपण त्याने तिला आईसक्रीम खाऊ घातले पण जास्त वेळ न थांबता ते पुढच्या प्रवासाला लागले.
साधारण बारा साडे बाराच्या सुमारास ते त्यांच्या घरी पोचले. आज प्रशांतचे सासरेपण घरी होते त्यामुळे जावयाचे एकदम जोरदार स्वागत करण्यात आले. अश्विनीच्या तब्येतीची विचारपूस करून झाल्यावर इकडच्या तिकडच्या गोष्टी सुरू झाल्या पण प्रशांतला आपण कशाला आलो आहोत हे चांगला माहिती असल्याने त्याने सरळ मुळ विषयाला हात घातला.
“बाबा मी आज सायलीला सोडायला आलोय, असे म्हणण्यापेक्षा तिला परत आमच्याकडे न्यायला आलो आहे, म्हणजे त्यासाठी तुमची परवानगी मागायला आलो आहे.”
“म्हणजे? मी तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही समजलो.” प्रशांतचे सासरे त्याच्या बोलण्यावर जरा बुचकळ्यात पडले.
“अहो बाबा आत्ताच सायलीचा रिझल्ट लागला आहे. त्यात तिला चांगले मार्क्स मिळाले आहेत. तेव्हा सायलीची आणि आमची अशी इच्छा आहे कि तिने पुढे शिकावं, तिने एम. कॉम. करावं. म्हणून मी खास तुमची परवानगी मागायला आलो आहे.”
प्रशांतने आपले बोलणे अगदी स्पष्ट शब्दात मांडले होते. सायली तिच्या खोलीतल्या पडद्या आडून त्यांचे बोलणे ऐकत होती. आता बाबा काय बोलतात याकडे तिचे सगळे लक्ष लागले होते. मनातल्या मनात ती देवाचा धावा करत होती. तिच्या छातीची धडधड वाढत चालली होती.
इतक्यात चहा घेऊन त्याच्या सासूबाई बाहेर आल्या. त्या दोघांचे बोलणे त्यांच्या कानावर पडले असावे. त्याला चहा देता देता त्या म्हणाल्या,
“जावईबापू, यंदा तिचे लग्न करून द्यावं, असं मला वाटतं. तिच्यात अजून अल्लडपणा आणि बालिशपणा खूप आहे. एकदा का संसाराची जबाबदारी तिच्या अंगावर पडली की तिला शहाणपण येईल. अश्विनीच्या बाबतीत ही काळजी आम्हाला नव्हती, त्यामुळे आम्ही तिला पुढे शिकायला परवानगी दिली. पण आजकाल शिक्षणपण किती महाग झालंय आणि त्यात हे पण पुढच्या वर्षी रिटायर्ड होणार आहेत. तेव्हा त्याआधी सायलीचे लग्न झाले तर बरं होईल असे मला वाटतं.”
आईचे बोलणे ऐकून सायलीचा पारा चढला आणि ती तडक बाहेर येऊन म्हणाली,
“इतकी जड झालीय का मी तुम्हाला, लगेच माझं लग्न करायचे म्हणताय ते? पण मी एक गोष्ट सांगून ठेवते की मला अजून किमान दोन वर्ष तरी लग्न करायचे नाहिये. तुम्हाला मला पुढे शिकवायचे नसेल तरी माझी काही हरकत नाही पण मी इतक्यात लग्न करणार नाहिये.”
“बघा कशी बोलतेय ती! आम्ही काय तुझे शत्रू आहोत का तुझं वाईट करायला?” तिची आई चिडत म्हणाली.
आता ती आणखिन काही बोलून गोष्ट हाताबाहेर जायच्या आत प्रशांत मध्ये पडला आणि तिला म्हणाला,
“सायली तू आत जाऊन बस शांतपणे, मी बोलतोय ना तुझ्या बाबांशी.”
“हे काय जिजू, तुम्हीपण मलाच आत जायला सांगताय?” सायली माझ्याकडे रागानेच बघत म्हणाली.
“सायली, जिजाजींशी असे बोलतं का कोणी, सॉरी म्हण त्यांना अगोदर!” तिची आई म्हणाली.
पण तिचे बाबा एवढे सगळे होऊनही शांतपणे बसून राहिले होते.
“सॉरी जिजू, मी असे बोलायला नको होतं.” इतकं म्हणून मी आत जायला वळली.
“हे बघ सायली, आम्ही जो काही निर्णय घेऊ तो तुझ्या हिताचाच असेल, याची तू खात्री बाळग. तुझा विश्वास आहे ना आमच्यावर?” प्रशांत तिला समजावत म्हणाला.
ती हो म्हणाली आणि आत निघून गेली. पुन्हा दारा आड उभी राहून त्यांच बोलणे ऐकू लागली. ती आत गेल्यावर प्रशांत म्हणाला,
“आई तुम्ही म्हणता ते पूर्ण चूक आहे, असे मी नाही म्हणत. पण माझ्या मते हे तिच्या लग्नाच वय नक्कीच नाहिये. त्यात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सायलीला समजपण थोडी कमी आहे आणि घाई घाईत जर तिचे लग्न लावून दिलं आणि तिकडेपण ती जमवून घेऊ शकली नाही तर मग तुम्ही काय करणार?
त्यापेक्षा आपण तिला अजून एक दोन वर्ष शिकवले आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापासून लांब राहिली तर तिला पटकन जगाची ओळख होईल. माझा असा अनुभव आहे की मुले जोपर्यंत आपल्या आई वडिलांच्या पंखाखाली असतात तोपर्यंत त्यांच्यात स्वत: निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होत नाही कारण आयुष्यातले महत्त्वाचे सगळे निर्णय आईवडील घेत असतात.
“ते लोक अंगावर जबाबदारी पडली की घाबरून जातात कारण त्यांच्यात स्वत: निर्णय घ्यायची क्षमता नसते. पण तेच लोक दहा लोकात वावरू लागले की ते पटकन तयार होतात. त्यांना स्वत:चं बरं वाईट कळू लागतं. आणि आणखिन एक गोष्ट तुम्ही तिच्या शिक्षणाच्या खर्चाची किंवा तिच्या लग्नाच्या खर्चाची काळजी करू नका. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत.”
त्याच म्हणणे तिच्या आई वडीलांना पटले असावे बहुतेक. तिचे बाबा इतका वेळ शांत बसून होते ते म्हणाले,
“जावई बापू खरं तर माझीपण खूप इच्छा होती की तिने पुढे शिकावं पण तिच्या आईचं असं म्हणणं आहे की तिचं यंदा लग्न करून टाकावं पण आता तुम्ही बोललात ते पटलं मला. अश्या परिस्थितीत तिचं लग्न करणं धोक्याचं ठरेल. आज ती जेमतेम वीस वर्षाची आहे तेव्हा अजून दोन वर्षांनी तसा काही फारसा उशीर होणार नाहिये. तेव्हा तिने तुमच्याकडे राहून शिकायला माझी तशी काहीच हरकत नाही. काय हो तुमचे काय मत आहे यावर?” त्यांनी सायलीच्या आईला विचारले.
“ठीक आहे, तिचं लग्न करून द्यावं अशी माझी इच्छा होती पण आता सायली येताना इतका मोठा वशिला घेऊन आली आहे की आम्हाला नाही बोलणं शक्यच नाही. तिने अश्विनीकडे रहायला माझी काहीच हरकत नाही.” तिची आई म्हणाली.
त्यांचे बोलणे ऐकून प्रशांतने सुटकेचा निश्वास टाकला. तिकडे सायलीची काय करू आणि काय नको अशी अवस्था झाली होती. तिची आई आत निघून गेली आणि सायली तिच्या रूममधून बाहेर आली आणि त्याच्या समोर येऊन बसत म्हणाली, “बाबा थँक्स!”
“सायली तुझे जिजाजी तुझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घेताहेत, तेव्हा आता सगळे तुझ्यात हातात आहे. नीट मन लावून अभ्यास कर आणि यशस्वी हो!” तिच्या बाबांनी तिला तिच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
बाबांचे बोलणे पूर्ण होताच सायली उठून जाऊ लागली, तेव्हा बाबा म्हणाले,
“सायली एवढी घाईने कुठे चाललीस?”
“मग आता निघायची तयारी नको का करायला?” सायली अल्लडपणे म्हणाली.
“अगं पण सायली तुझी सर्टिफिकिट्स कुठे आहेत? ती तर अजून कॉलेजमध्येच आहे आणि ती आणल्याशिवाय तू कशी जाऊ शकशील?” बाबा म्हणाले.
सायलीने या गोष्टीचा विचारच केलेला नव्हता, ती प्रशांतच्या प्रेमात इतकी रमली होती की या फॉरमॅलीटी पूर्ण कराव्या लागतील हे तिच्या बाबांनी सांगितल्यावर ती भानावर आली. आज ती प्रशांतबरोबर परत जाऊ शकणार नव्हती हे नक्की होते, त्यामुळे परत तिच्या चेहऱ्यावर उदासी पसरली व उठून सरळ आपल्या रूममध्ये गेली आणि तिला समजावायला प्रशांतही तिच्या मागे गेला.
“अग सायली आता काय आई बाबांची परवानगी तर मिळाली आहे, तेव्हा फक्त सात आठ दिवसांचा प्रश्न आहे. तू तुझी सगळी काम झाली की मला ऑफिसला फोन कर म्हणजे मी तुला परत न्यायला येईन.” प्रशांत तिची समजूत काढत म्हणाला.
“पण जिजू आठ दिवस तुमच्या शिवाय कशी राहू मी इकडे?” सायली म्हणाली.
“कशी म्हणजे पूर्वी रहायचीस तशीच, हे बघ तुझ्या उदास होऊ बसलीस तर घरच्यांना संशय येईल, तेव्हा एंजॉय कर, मैत्रिणींना जाऊन भेट.” प्रशांत म्हणाला.
“जिजू मी प्रयत्न करेन, पण मला तुमची आठवण आली की मी तुम्हाला ऑफिसला फोन करत जाईन.” सायली त्याला बिलगत म्हणाली.
प्रशांतने लगेच तिला आपल्यापासून दूर केले.
“सायली असा वेडेपणा करू नकोस नाही तर तुझ्या बरोबर माझीपण काही खैर नाही.”
प्रशांतने आज बाजी मारली होती, तिला लग्नाच्या दाढेतून त्याने ओढून परत आणले होते. आता त्यांच्या सुखद संबंधाचा मार्ग मोकळा झाला होता.
त्या दिवशी दुपारी जेवून व थोडा आराम करून साधारण पाच वाजता तो परत जायला निघाला. त्याला बाहेर पडलेले बघून सायलीचे डोळे भरून आले होते पण मागे आपल्या आई बाबांची चाहुल लागताच तिने स्वत:ला सावरले. त्यांचा निरोप घेऊन प्रशांत घरी परत आला.
त्या दिवशी प्रशांत सायलीला सोडून आपल्या घरी परत आला, पण येताना त्याच्यापेक्षाही सायलीला त्याचा विरह जास्त वाटत होता. प्रशांत गेल्यावर तिला खूप एकटे एकटे वाटू लागले होते. पण दुसर्याच दिवसांपासून तिची सर्टिफिकिट्स गोळा करायची धावपळ सुरू झाली होती. इकडे सोमवारपासून अश्विनीपण शाळेत जायला लागल्यामुळे सगळ्यांचे शेड्युल आता जवळपास सेट व्हायला लागले होते.
आठवड्या भरातच सायलीने सर्व सर्टिफिकिट्स गोळा केलीत आणि प्रशांतला फोन करून बोलावून घेतले. आता सायली त्यांच्याकडे पुढील दोन वर्ष राहणार होती आणि आपल्या लाडक्या जिजू बरोबर मज्जा करणार होती पण हो सर्व काही अश्विनीताई आणि अभीच्या नकळत!